पुणे : गॅसचा स्फोट होऊन इमारत कोसळली; चौघे गंभीर जखमी - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 2, 2020

पुणे : गॅसचा स्फोट होऊन इमारत कोसळली; चौघे गंभीर जखमी

 


पुणे, दि. 2 : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन इमारत कोसळून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यातील वडगावशेरी येथे बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

या दुर्घटनेत बाळासाहेब आप्पाजी भोंडवे (वय 50), नीरा बाळासाहेब भोंडवे (वय 45), अनुराधा बाळासाहेब भोंडवे (वय 20) आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी एक महिला चहा बनवण्यासाठी गॅस सुरू करत असताना हा भीषण स्फोट झाला. वडगावशेरीच्या गणेशनगर भागातील या घटनेनंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->